शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा

वेंगसरकर, वाड, सुमारीवालांना जीवनगौरव

| पुणे | प्रतिनिधी |

क्रीडा नैपुण्याने महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची अखेर राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये बॅडिमटन संघटक श्रीकांत वाड, भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि ॲथलेटिक्स संघटक आदिल सुमारीवाला यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

तीन वर्षांपासून (2019-20, 2020-21, 2021-22) थकलेल्या या पुरस्कारांची घोषणा (माजी) क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली. पुरस्कारासाठी अर्ज आल्यापासून त्यांची छाननी आणि दोन वेळा घेण्यात आलेल्या हरकतींनंतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात शासनाला उशीरच झाल्याची भावना क्रीडाक्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होती.

जीवनगौरव (3), क्रीडा मार्गदर्शक (13), जिजामाता (1), खेळाडू (81), साहसी प्रकार (5) आणि दिव्यांग खेळाडू (14) असे एकूण 117 पुरस्कार या तीन वर्षांसाठी देण्यात आले आहेत. हरकतींचा विचार करून पुरस्कार यादी अंतिम करण्यात आली असे अध्यादेशात म्हणण्यात आले असले, तरी कुठल्या खेळ, खेळाडूंबाबत आणि किती हरकती आल्या याचा मात्र उल्लेख करण्यात आलेला नाही.

क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार
2019-2020 :
डॉ. आदित्य जोशी (जिम्नॅस्टिक), शिरीन गोडबोले (खो-खो), संजय भोसकर (दिव्यांग खेळासाठी), प्रशांत चव्हाण, प्रताप शेट्टी (दोघे कबड्डी), अमरसिंह निंबाळकर (कुस्ती), दर्शना पंडित (सॉफ्टबॉल); 2020-21 : संजोग ढोले (जिम्नॅस्टिक), राहुल राणे (स्केटिंग), डॉ. अभिजित इंगोले (सॉफ्टबॉल), विनय साबळे (दिव्यांग खेळासाठी); 2021-2022 : सिद्धार्थ कदम (जिम्नॅस्टिक), चंद्रकांत इलग (तिरंदाजी), किशोर चौधरी (सॉफ्टबॉल).

दिव्यांग खेळाडू
2019-20 :
योगेश्वर घाटबांधे, भाग्यश्री माझिरे (दोघे ॲथलेटिक्स), मीन बहादूर थापा (व्हिलचेअर बास्केटबॉल), आरती पाटील (बॅडिमटन), मृणाली पांडे (बुद्धिबळ). 2020-21 : दीपक पाटील, वैष्णवी जगताप (दोघे जलतरण), सुरेश कार्की (व्हिलचेअर बास्केटबॉल), मिताली गायकवाड (पॅरा-तिरंदाजी). 2021-22 : प्रणव देसाई, आकुताई उलभगत (दोघे ॲथलेटिक्स), अनिल काची (व्हिलचेअर बास्केटबॉल), अनुराधा साळुंकी (व्हिलचेअर तलवारबाजी), भाग्यश्री जाधव (ॲथलेटिक्स).

साहसी पुरस्कार
2019-20 :
सागर कांबळे (जल), कौस्तुभ राडकर (जमीन). 2020-21 : कृष्ण प्रकाश (जमीन), केवल कक्का (थेट पुरस्कार). 2021-22 : जितेंद्र गवारे (जमीन).

क्रीडा पुरस्कार खेळाडू
2019-20 :
स्नेहल मांढरे (तिरंदाजी), पारस पाटील, अंकिता गोसावी (दोघे ॲथलेटिक्स), विजय न्हावी, शीतल शिंदे (दोघे आट़यापाट़या), तन्वी लाड (बॅडिमटन), सौरभ लेणेकर (बॉक्सिंग), प्रणिता सोमण (सायकलिंग), जय शर्मा (तलवारबाजी), सायली जाधव (कबड्डी), सागर नागरे (कनॉइंग-कयाकिंग), प्रतीक वाईकर, आरती कांबळे (दोघे खो-खो), दीपक शिंदे, प्रतीक्षा मोरे (मल्लखांब), नाजुका घारे (पॉवरलिफ्टिंग), भक्ती खामकर (नेमबाजी), अरहंत जोशी, श्रुतिका सरोदे (दोघे स्केटिंग), अभिजित फिरके, हर्षदा कासार (दोघे सॉफ्टबॉल), सिद्धी मणेरीकर (स्पोर्ट्स क्लाइम्बिग), मिहीर आंब्रे, साध्वी धुरी (दोघे जलतरण), मेघाली रेडकर (डायव्हिंग), अश्विनी मळगे (वेटलिफ्टिंग), सोनबा गोंगाणे, सोनाली तोडकर (दोघे कुस्ती).

2020-21 : विशाल फिरके, शीतल ओव्हाळ (दोघे आट्यापाट्या), यशिका शिंदे (नेमबाजी), स्वप्नाली वायदंडे (सॉफ्टबॉल), रेश्मा पुणेकर (बेसबॉल), मिताली वाणी (वुशू), सूर्या थटू, प्रियांका कारंडे (दोघे सायकलिंग), अजय सावंत (अश्वारोहण), निलेश साळुंके, मीनल जाधव (दोघे कबड्डी), अक्षय भांगरे, प्रियंका भोपी (दोघे खो-खो), अथर्व कुलकर्णी, आदिती धांडे (दोघे स्केटिंग), सिद्धेश पांडे (टेबल टेनिस), श्रेया बोर्डवेकर (पॉवरलिफ्टिंग), अनिल मुंढे (कॅरम), ऋतुजा तळेगावकर (जलतरण), सुरज कोकाटे, कोमल गोळे (दोघे कुस्ती).

2021-2022 : मयूर रोकडे, मोनाली जाधव (दोघे तिरंदाजी), सर्वेश कुशारे (ॲथलेटिक्स), अजित बुरे, वैष्णवी तुमसरे (आट़यापाट़या), मालविका बनसोड (बॅडिमटन), हरिवंश टावरी (बॉक्सिंग), अक्षय आव्हाड, मंजुषा पगार (दोघे बेसबॉल), राजेश इरले (शरीरसौष्ठव), देवेंद्र सुर्वे (कनॉइंग-कयाकिंग), संकल्प गुप्ता (बुद्धिबळ), मयुरी लुटे (सायकलिंग), अभय शिंदे, वैदेही लोहिया (तलवारबाजी), अर्जुन कढे (टेनिस), ऋग्वेद जोशी (जिम्नॅस्टिक्स-ॲरोबिक्स), अक्षय गणपुले, अपेक्षा सुतार (दोघे खो-खो), साहिल उतेकर, सोनल सावंत (दोघे पॉवरलिफ्टिंग), नीलेश धोंडगे (रोईंग), भरत चव्हाण (रग्बी), अभिज्ञा पाटील (नेमबाजी), यश चिनावले, कस्तुरी ताम्हणकर (दोघे स्केटिंग), सुमेध तळवेलकर (सॉफ्टबॉल), ऋतिक मारणे (स्पोर्टस क्लाइम्बिग), ज्योती पाटील (जलतरण), संकेत सरगर (वेटलिफ्टिंग), हर्षवर्धन सदगीर, स्वाती शिंदे (दोघे कुस्ती).

Exit mobile version