| नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या समस्या मुख्यालयी पोहचाव्या यासाठी प्रवासी सल्लागार समिती गठीत करीत असते. मेन लाईन वरील कर्जत एंड कडून नेरळ, माथेरान आणि भिवपुरी रोड या स्थानकातील उपनगरीय प्रवासी यांची नावे सल्लागार समिती सदस्य म्हणून जारी केली आहेत. कर्जत दिशेकडील नेरळ स्थानक प्रवासी सल्लागार समितीची नावे मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक जितेंद्र यादव यांनी घोषित केलेली आहेत. नेरळ प्रवासी सल्लागार समितीमध्ये नेरळ प्रवासी सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले संदीप म्हसकर, नितीन कांदळगावकर, संतोष शिंगाडे, योगेश ठक्कर, प्रमोद डबरे, अमित जैन यांचा समावेश आहे. तर भिवपुरी रोड प्रवासी सल्लागार समितीमध्ये राजेश भगत, रोशन पाटील, दर्शन कांबरी, अक्षय बुंधाटे, गुरुनाथ पाटील, धनंजय थोरवे, शोभा शेंडे यांचा समावेश आहे. या सर्वांना रेल्वेचे नेरळ परिसर कमर्शियल निरीक्षक शिरीष कांबळे यांचे हस्ते पत्र देण्यात आले. माथेरान रेल्वे स्थानक प्रवासी सल्लागार समितीमध्ये प्रदीप घावरे, प्रवीण सकपाळ, चंद्रकांत जाधव, आकाश चौधरी आदींचा समावेश आहे.या सर्व सदस्यांची मुदत एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीसाठी असणार आहे.