संतापजनक! अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग

आरोपींवर गुन्हा
माणगाव | वार्ताहर |
अल्पवयीन 17 वर्षीय मुलाचे जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकपणे संभोग केल्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना दि.1 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9 पासून ते माहे एप्रिल 2021 दरम्यान माणगाव तालुक्यातील जावटे गावात घडली. याबाबतची फिर्याद मुलाच्या वडिलांनी दि.6 जुलै रोजी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील जावटे गावात राहणार्‍या सर्व पाच आरोपींनी फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलाचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याच्यासोबत जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकपणे संभोग करून पीडित मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

Exit mobile version