अय्यरसह, किशनची काढली विकेट
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (दि.28) 2023-24 हंगामातील खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. हे करार भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघासाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असतील. या करारामध्ये एकूण 30 खेळाडूंचा समावेश आहे. यात केवळ चार खेळाडूंना + श्रेणीत स्थान देण्यात आले आहे, तर युवा खेळाडू यशस्वी जैस्वालचा बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. करारात ग्रेड अ+, अ ग्रेड, ब ग्रेड आणि क ग्रेडमध्ये असं वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच, त्यांचे वार्षिक उत्पन्न श्रेणींनुसार ठरविण्यात आले आहे.
अय्यर, इशान करारातून बाहेर बीसीसीआयने फलंदाज श्रेयस अय्यर तसेच, यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यांना या करारातून वगळले आहे. याव्यतिरिक्त, जे खेळाडू चालू कालावधीत किमान 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय सामने किंवा 10 20 खेळण्याचे निकष पूर्ण करतात. त्यांना सी ग्रेडमध्ये समाविष्ट केलं जाईल. यात ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. जर ते धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघात समाविष्ट असल्यास त्यांना ग्रेडमध्ये समाविष्ट केलं जाईल.
ग्रेड अ+ (4 खेळाडू) रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
ग्रेड अ (6 खेळाडू) आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या
ग्रेड ब (5 खेळाडू) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
ग्रेड क (15 खेळाडू) रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.







