पनवेलमध्ये शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन शुक्रवारी (दि.18) रोजी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट क्लब येथे होणार आहे. या अधिवेशनात 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत रूजु झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीत होणार्‍या वेतन त्रुटीचे निराकरण करावे, आंतरजिल्हा बदलीचा प्रश्‍न मार्गी लावावा, वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करावी, महागाईच्या प्रमाणात शिक्षण सेवकांचे मानधन 30 हजार करण्यात यावे, विषय पदवीधर शिक्षकांना विषय निहाय 33 टक्के अट रद्द करून सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, कर्तव्यावर असताना कोव्हिडने मृत झालेल्या शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे अशा अनेक मागण्या करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपदी आ.बाळाराम पाटील असणार आहेत. तसेच या शिक्षक परिषदेला राज्यातील मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहे.

Exit mobile version