श्रीसेवाशक्ती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
श्रीसेवाशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चोरोंडेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सुमती प्रगती मंडळ सभागृह, बहिरोळे, मु. टाकादेवी येथे संस्थेचे चेअरमन सीताराम शामराव कवळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सर्वसाधारण सभेसाठी चेअरमन सीताराम कवळे, व्हा. चेअरमन संपदा दाबके, संचालक नितीन अधिकारी, संतोष राऊत, केशव चांदोरकर, सुनील थळे, समद कूर, राजन नार्वेकर, स्मिता राऊत, तज्ज्ञ संचालक प्रकाश ठाकूर, व्यवस्थापक जितेंद्र मापगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सीताराम कवळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेची आर्थिक आकडेवारी जाहीर केली. 23 कोटी 50 लाख ठेवी झाल्या असताना गत 6 महिन्यात त्यामध्ये 2 कोटीच्यावर वाढ झाली असून वार्षिक सरासरीमध्ये 14.95 टक्के इतकी वाढ झाली, तसेच संस्थेचे एकूण कर्ज वाटप 15 कोटी 51 लाख एवढे आहे. वार्षिक सरासरीमध्ये 11.17 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी चेअरमन सीताराम कवळे यांनी 10.50 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले.

भविष्यामध्ये संस्थेचे डिजिटिलायझेशन करण्याचा मानस संस्थेने केला आहे. देशातील तरुण पिढीला सहकार क्षेत्राची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने स्पर्धात्मक युगात टीकून राहणे यासाठी एनइएफटी, आरटीजीएम, मोबाईल बँकींग, क्युआर कोडची सुविधा देण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे असेही संस्थेचे चेअरमन सीताराम कवळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. सूत्रसंचालन संस्थेचे लिपीक सुनील कैलकर यांनी केले. तर आभार व्हा. चेअरमन संपदा दाबके यांनी केले. या या वर्षिक सभेसाठी 125 सभासदांची उपस्थिती होती.

Exit mobile version