| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाका या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग घरत होते. या सभेत संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
प्रारंभी कोरोनाच्या महामारीने बळी घेतलेल्या सभासदांचा दु:खवट्याचा ठराव करुन मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यांत आले. सन 2019 ते 2021 पर्यंत तिन वर्षाचा अहवाल मंजूर करण्यात आला. सन 2019-20 ते 2021-22 या वर्षाचा जमाखर्च मंजूर करण्यात आला. सन 2022 ते सन 2023 चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. याच कार्यक्रमात संस्थेचे सभासद भालचंद्र शांताराम म्हात्रे, भुते-लोणारे यांची नात रायगड भूषण शर्विका म्हात्रे, संस्थेचे कार्यकारिणी सभासद रायगड भूषण नवीनचंद्र राऊत, गुंजीस, रायगड भूषण बिपिन विठोबा राऊत, थळ यांचा सत्कार करण्यात आला. विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्यांमध्ये गजानन नारायण पाटील व संस्थेच अध्यक्ष श्रीरंग घरत यांचा सत्कार करण्यांत आला.
त्यानंतर संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. त्यामध्ये श्रीरंग घरत, तुकाराम म्हात्रे, मधुकर पाटील, कमळाकर राऊत, विठोबा म्हात्रे, नवीन राऊत, अरुण पाटील, ऍड. प्रकाश कानडे, नामदेव पाटील, सीताराम पाटील, नरेश नाईक, गजानन पाटील कृष्णा दळवी, हरिचंद्र सानकर आणि विकास काठे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. तुकाराम म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर सभेचे कामकाज संपले. सभा पार पाडण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी विशेष मेहनत घेतली.







