। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरीक संघ, हाशिवरे खारेपाट विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा चिंचवली ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. संघाचे अध्यक्ष जीएम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस बबन पाटील, राजाराम गावंड, अर्जुन गावंड, द. र. मोकल, नरहरी म्हात्रे, विजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत वाघ्रण येथील पत्रकार दीपक पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
जी.एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अर्थसंकल्प विजय पाटील यांनी मांडला. अशोक ठाकूर यांनी वाचन केले. त्याचबरोबर दहावी, बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या फोफेरी, हाशिवरे आणि मानकुळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. संघाच्या देणगीदारांचाही सन्मान करण्यात आला. नवीन सभासदाचे स्वागत करण्यात. आभार द. र मोकल यांनी मानले.