। म्हसळा । वार्ताहर ।
श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड या संस्थेची नुकतीच वार्षिक सभा 14 जुन रोजी संपन्न झाली. माजी सचिव नितीन रिकामे यांनी सभेमध्ये 2022-23 या वर्षाच्या केलेल्या कामांचे वाचन करण्यात आले व 2024-25 या वर्षी घेण्यात येणार्या कार्यक्रमाचे देखील सविस्तर माहिती सांगण्यात आली. तसेच, या सभेमध्ये अध्यक्षांच्या सहमताने नविन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. या मध्ये उपाध्यक्षपदी नरेश विचारे तर सचिव पदी संतोष उद्धरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणुन समीर लांजेकर व सुजित काते यांची वर्णी लागली आहे.
यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, उपाध्यक्ष नरेश विचार, सचिव संतोष उध्दरकर, सह. सचिव स्वप्नील लाड, खजिनदार सुशांत लाड, सदस्य दतात्रेय लटके, नितीन रिकामे, संतोष घडशी, तुकाराम भेलेकर, सुजित काते, समीर लांजेकार, किशोर गुलगुले, संदिप रिकामे, शांताराम निंबरे तसेच सर्व सभासद उपस्थित होते.