पीएनपी प्राथमिक शाळा वेश्‍वी येथे वार्षिक बक्षिस वितरण


| अलिबाग | वार्ताहर |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा वेश्‍वी गोंधळपाडा ता. अलिबाग येथे वार्षिक बक्षिस वितरण समारंभ पार पाडण्यात आला. या समारंभाला भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ व माता पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे यांनी उपस्थित पाहूण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर वर्षभरातील झालेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धामध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहूण्याच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती म्हात्रे व आभार प्रदर्शन गावित यांनी केले.

Exit mobile version