रोह्यात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील एमडीएम फ्युचर स्कूल कोलाड वरसगाव येथे तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि. 14ते 16 डिसेंबर तीन दिवसांत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
पहिल्या दिवसाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन संदीप तटकरे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना सद्यःस्थितीत असलेल्या मैदानी स्पर्धांचे महत्त्व संदीप तटकरे यांनी पटवून दिले. सलग तीन दिवस नर्सरी, ज्युनिअर, सीनियर ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये चिमुकल्यांसाठी बुक बॅलेंसिंग, सॅक्‌‍ रेस, फिश रेज, पोटॅटो रेस, हॉपिंग रेससारख्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तर मोठ्या विद्यार्थ्यांसाठी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, रिले रेस, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक भालाफेक सारख्या स्पर्धा व पालकांसाठी बुक बॅलेंसिंग, संगीत खुर्ची, धावणे, क्रिकेट यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. शनिवारी तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सांगता अतिशय उत्साहात पार पडली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजित साबळे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्यासह संस्थेचे सचिव प्रकाश सरकले, रजिस्टर अजित तेलंगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर, प्राचार्य योगिनी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून पुढील स्पर्धांकरिता शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version