राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री ?

| मुंबई | वृत्तसंस्था |

ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा अपूर्ण आहे. गेल्या 5 दशकांपासून या कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन त्याला आकार दिला आहे. पिढ्यानपिढ्या हे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे. आता यात आणखी एका नावाची चर्चा होत आहे.

राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली आहे. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे.

Exit mobile version