आणखी एक हनी ट्रॅप उघडकीस; आरोपी तेच, पुन्हा अटकेत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप पाठवून पाच लाखाची खंडणी मागणार्‍या एक महिला आणि तिच्या साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर याच दोघांच्या सापळ्यात अडकून लुबाडलेल्या आणखी एकाने मांडवा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामुळे आधिच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या दोघाजणांना पुन्हा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या जोडगोळीने या इसमाकडून सात लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. अधिक तपासासाठी दोघांना 18 फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आवास येथील तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणार्‍या धनश्री तावरे आणि संजय सावंत या जोडगोळीला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याच दोघांकडून महिन्यापूर्वी अशाच प्रकारे लुबाडलेल्या इसमाने पुढे येत मांडवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 13 ते 16 जानेवारी दरम्यान आवासफाटा येथे संजय सावंत रा.तळवडे, पोस्टकामार्ले, ता.अलिबाग यांने त्याच्या मोबाईलनंबर 7083381000 वरून परहुर येथील इसमाला फोन करून 13 जानेवारी रोजी धनश्री तावरे हिच्यासोबत नवखार येथील कॉटेज येथील शारीरिक संबधाची माहीती तिच्या पती व नातेवाईक यांना मिळाल्याने ते तुला मारण्याकरीता निघालेले आहेत. असे सांगत भीती घातली. सदरचे प्रकरण मिटवण्याकरीता या जोडगोळीने सगंनमत करून 10 लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 16 जानेवारी रोजी 7 लाख रूपये रोख रक्कम स्विकारले. आणि त्याच्या मोबाईलमधुन व्हॉटसअप चॅट, तसेच गॅलरीतील फोटो डिलीट करून पुरावा नष्ट केला. या गुन्ह्यातील दोघांनाही 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा अटक करण्यात आली आहे.

याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 384, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस हवालदार चेतन म्हात्रे हे करीत आहेत.

Exit mobile version