। नवी दिल्ली ।वृत्तसंस्था ।
युक्रेनमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा चंदन जिंदल हा विद्यार्थी आजारी पडला होता. उपचारावेळी त्याचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे.
चंदन जिंदाल (२२) हा पंजाबमधील रहिवासी असून तो युक्रेनमधील विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. जिंदालला मेंदूत इस्केमिक स्ट्रोक (मेंदूला रक्त पुरवठा कमी होणे) आल्याने त्याला याच शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहिले आहे.