। मुंबई । वृत्तसंस्था ।
रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबारात जखमी झाल्याचं वृत्त आहे. केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
हजारो विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यात आलं असून अद्याप हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हसह दुसऱ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विशेष दूत म्हणून पाठवण्यात आलेल्या चार मंत्र्यांपैकी जनरल सिंग हे एक आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यावर गोळी झाडली गेल्याची माहिती दिली.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी आज एएनआयला हा विद्यार्थी किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. युद्धादरम्यान, हे सगळं होत असल्याचंही मंत्री म्हणाले आहेत.
किव्हमधील गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी
