घोणसे घाटात पुन्हा अपघातांची मालिका

पर्यायी उतार मार्ग अधिकच धोक्याचा
| म्हसळा | वार्ताहर |

दिघी – पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात पुन्हा अपघातांची मालिका सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मालवाहतूक करणार्‍या दोन वाहनांचा अपघात होऊन तीन जखमी झाले तर मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.

मालवाहतूक करणार्‍या टेम्पोचा तर रेती वाहतूक करणार्‍या डंपर या गाडीचा अपघात झाला आहे. दैवय ोगाने दोनही अवजड वाहने दरीत कोसळली नाहीत अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.येथे रस्ता विकासकाने अपघात होतात म्हणून चार महिन्यापूर्वी पक्के बांधकाम करून संरक्षण भिंत बांधली आह. त्याचा तात्पुरता का होईना पण मोठ्या प्रमाणात वित्त हानी वगळता जीवित हानी होण्यापासून तात्पुरती सुटका करून दिली आहे. माणगावकडून म्हसळा शहराकडे येताना घोणसे घाटात शेवटच्या 500 मिटर अंतराच्या तीव्र उतार वळणावर एकाच ठिकाणी अंदाजे लहान मोठे 50 अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही गंभीर स्वरूपाच्या तर काही मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेल्या आहेत.यातील अर्ध्या अधिक अपघातांची नोंद म्हसळा पोलिस ठाण्यात झाली आहे मात्र मालवाहतूक किंवा अवजड वाहनांच्या अपघाताची मालिका पहाता तशी सरसकट अपघात नोंद म्हसळा पोलिस ठाण्यात होताना दिसत नाही .

घोणसे घाटातील 500 मीटर लांबीचे अपघाती तीव्र उतार वळणावर नवीन बांधकाम केल्या पासुन सातत्याने अपघात होत आहेत.2022 माहे मे महिन्यात या ठिकाणी खाजगी बसचा अपघात होउन एकाच वेळी सहा प्रवासी दगावण्याची व अनेक जणांना कायम जायबंदी व्हावे लागले आहे त्या नंतर येथे अपघाताची मालिका सुरूच आहे.प्रचंड प्रमाणत वित्त हानी होते आहे.शासनाने याची दखल घेऊन अधिक जीवित व वित्त हानी टाळन्यासाठी घोणसेघाट अपघाती उतार वळणासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात यावा नाहीतर असेच अपघात घडत राहतील.कधी काळी आमच्यासह आमच्या जिवाभावाच्या लोकांना गमावू शकतो अशी भिती व्यक्त करताना अपघाती पर्यायी मार्ग बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या कडे केली आहे.

Exit mobile version