शिवप्रेमींच्या सेवेस आणखी एक ट्रॉली

किल्ले रायगडावर रोपवेत आणखीन एक नवीन ट्रॉली

| महाड | वार्ताहर |


रायगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी रोप-वेच्या सध्या तीन ट्रॉल्या होत्या, त्यामधून एका वेळेला 32 प्रवासी चढ-उतार करत होते. पण, या रोप-वेला आणखी एक ट्रॉली लावण्यात आल्याने आता एकाच वेळी 48 प्रवासी चढ-उतार करुन शकणार आहेत. ज्यात 24 वर जाणाऱ्या आणि 24 खाली येणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. या ट्रॉलीची चाचणी पूर्ण झाल्यानींक्ष 24 एप्रिलपासून पर्यटकांसाठी खुली होणार आहे.

महाराष्ट्रसह जगभरातून किल्ले रायगड पाहायला येणाऱ्या शिवभक्त शिवप्रेमी पर्यटक यांच्या सेवेसाठी रायगड रोपवे प्रशासन सज्ज झाले असून, रायगड रोपवेची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू आहे. रोपवेमध्ये आणखी नवीन ट्रॉलीची भर पडली असून, किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना रोपवेतून गडावर जाण्यासाठी जी वाट पाहावी लागत होती, ती आता काहीशा प्रमाणात निश्चितच कमी होणार आहे. पर्यटकाकडून रायगड रोपवे प्रशासनाला धन्यवाद देण्यात येत असल्याचे ऐकायला मिळत आहेत.

त्याआधी तीन ट्रॉल्या गडावर जात होत्या, त्याचवेळी तीन ट्रॉल्या खाली येत होत्या; परंतु अजून एक नवीन ट्रॉली वाढल्याने गडावर जाणाऱ्या पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चार ट्रॉल्या चालू केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक ट्रॉलीत चार माणसे बसविली जातील आणि येणाऱ्या 23 तारखेला शिवपुण्यतिथी दिनी नवीन ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा करून त्यानंतर रितसर चार ट्रॉल्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगड रोपवे प्रशासनाच्या वतीने रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी दैनिक कृषीवलशी बोलताना सांगितले.

गडावर जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी 310 रुपये रिटर्न तिकीट असणार आहे, तर सिंगल तिकीट 200 रुपये असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 200 रुपये तिकीट ठेवले आहे. लहान मुलांसाठी उंचीप्रमाणे तीन फुटाच्या खाली जी मुले असतील, त्यांच्यासाठी फ्री तिकीट तर तीन व चार फुटांमध्ये सवलत तिकीट दोनशे रुपये असणार आहे, तसेच चार फुटांच्या वर फुल तिकीट असणार आहे. अपंग व्यक्तीसाठी रायगड रोपेकडून फ्री सवलत ठेवली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिली ते सातवीपर्यंत 190 रुपये रिटर्न ठेवले आहे. यामध्ये सिंगल 130 रुपये आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 225 रुपये रिटर्न व सिंगल 190 रुपये तिकीट दर असल्याचे रोपवे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, याआधी किल्ले रायगडवर जाण्यासाठी तीन तसेच खाली येण्यासाठी तीन ट्रॉली अशा होत्या; परंतु आता एक नवीन ट्रॉली बसवण्यात आले असल्याचे किल्ले रायगडावर जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा होणार नाही, शिवाय वेळेचेही बचत होणार आहे. रायगड रोपवे दिवसेंदिवस प्रगतीपथावर असल्याने गडावर येणाऱ्या शिवप्रेमींसह पर्यटकांकडून रोपवे प्रशासनाचे कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे.

Exit mobile version