| पनवेल | प्रतिनिधी |
अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. 15) खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत जनतेला माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
या अंतर्गत येथील सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी ते खांदेश्वर पोलीस ठाणे येथे मानवी साखळी व पायी रॅलीत 110 विद्यार्थी शिक्षक व पो. अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग घेतला. त्यानंतर खांदेश्वर पोलीस ठाणे येथील सायकल रॅलीत रोटरी क्लबने सहभाग घेतला. त्यानंतर रायन स्कूल सेक्टर 11 येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले, तसेच एनएमएमटी बस डेपो आसुडगाव, सेंट जोसेफ स्कूल, सेक्टर-7, नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्टेशन, आदई ग्रामपंचायत, बालाजी स्प्लेंडर फेज 2, आदई येथे अष्टविनायक गृह संकुल फेज 2 सोसा. आदई येथे सन बेन सोसायटी आसुडगाव, पुष्प विनायक कॉम्प्लेक्स आदई गाव येथेसुद्धा अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी यावेळी दिली.







