। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड पोलीस स्टेशनच्यावतीने दि.25 रोजी श्रमिक विद्यालय चिल्हे, श्री रा.ग. पोटफोडे विद्यालय खांब या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवनाचे दुष्परिणाम यावर कोलाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन मोहिते यांनी चांगले विवेचन करून कोणाही विद्यार्थ्याने अथवा त्यांच्या पालकांनी अमली पदार्थांचे सेवन करू नये, तसेच त्यांना सेवन करण्यास देऊ नये यासाठी प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जगताप माळी, मरवडे व इतर सर्व शिक्षक वर्ग तसेच जवळपास 300 विद्यार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे कोलाड आंबेवाडी नाका येथे मिनीडोर रिक्षा चालक संघटना रिक्षा चालक संघटना यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर सदस्य यांना अमली पदार्थ विरोधी प्रचाराकरिता पत्रक यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रिक्षा चालकांनादेखील अमली पदार्थांचे सेवन करू नये याकरिता प्रतिज्ञा देण्यात आली.