| पनवेल | प्रतिनिधी |
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्जता तपासण्यासाठी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्यावतीने पनवेल रेल्वे स्थानकातील नवीन बुकिंग हॉल येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. ही मॉकड्रिल मुंबई लोहमार्ग हार्बर विभागोच सहाय्यक पोलीस आयक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, जलद प्रतिसाद पथक, तसेच नवी मुंबई व पनवेल तालुका पोलीस, अग्निशामक दल आणि होमगार्ड यांचा सहभाग होता. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली ही मॉक ड्रिल दुपारी 12.40 वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली. मॉकड्रिल दरम्यान संशयित इसमाच्या बॅगची पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणीअंती कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. ही मॉकड्रिल पूर्णतः शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली असून आपत्कालीन परिस्थितीत तत्पर प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने ही मॉक ड्रिल उपयुक्त ठरली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.






