साळाव चेकपोस्टवर अँटीजन तपासणी


25 जणांची चाचणीत एक पॉझिटिव्ह रूग्ण
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
विनाकारण फिरणार्‍यांवर साळाव चेकपोस्ट येथे रेवदंडा पोलिसांनी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने अँटीजन तपासणी घेतली. यामध्ये पंचवीस जणांच्या चाचणीत एक जण पॉझिटिव्ह रूग्ण सापडला.

साळाव चेकपोस्ट येथे कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्‍वभुमीवर रेवदंडा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पंचवीस जणांची तेथेच अँटीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये एक जण पॉझिटिव्ह रूग्ण सापडला, बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे बहूमूल्य सहकार्य या कामी लाभले. बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चेहेर सबसेंटरच्या डॉ. प्रियांका जानकर व आशा सेविका निडी गावच्या कल्पना नयन पाटील, आशा सेविका साळाव गावच्या माधुरी कांबळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सापडलेल्या पॉझिटीव्ह रूग्णांस साळाव जेएसडब्लू रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यास सांगितले आहे. मुरूड तालुक्यातील निडी व कोर्लई गावात मोठया संख्येने कोरोना रूग्ण आढळल्याने ही दोन्ही गावात बंदी बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version