रेवदंड्यात विनाकारण फिरणार्‍यांची अँटिजेन चाचणी


। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा पारनाका येथून ये-जा करणार्‍या, तसेच विनाकारण फिरणार्‍यांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ही कारवाई करण्यात आली.
रेवदंडा व चौलमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाला असून, रेवदंडा पोलीस ठाणे यांनी बोर्ली प्राथमिक केंद्राच्या सहकार्याने साळाव चेकपोस्ट येथे व रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने चौल नाका येथे अँटिजेन चाचणी घेण्यात आली. यामध्ये साळाव येथे पंचवीस जणांच्या अँटिजेन चाचणीमध्ये एक जण पॉझिटिव्ह सापडला, तर चौल नाका येथील अँटिजेन 26 जणांच्या चाचणीत पाच जण पॉझिटिव्ह सापडले.

दरम्यान, रेवदंडा-चौलमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण मोकाटपणे फिरत असल्याच्या तक्रारीनुसार, चौल ग्रामपंचायतीत झालेल्या सभेत अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पॉझिटिव्ह रूग्ण फिरताना आढळल्यास त्वरेने गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले. त्यानुसार रेवदंडा पारनाका येथे रेवदंडा पोलीस ठाणे व रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विनाकारण फिरणार्‍यांना थांबवून त्यांची अँटिजेन चाचणी घेण्यात आली. यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी उपस्थित राहून पोलीस बंदोबस्तास सहकार्य केले.

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जुईली वाकडे व कर्मचारी संगिता कासकर यांनी विशेष परिश्रम घेऊन अँटिजेन चाचण्या केल्या. दरम्यान, अलिबागचे प्रांताधिकरी प्रशांत ढगे यांनीसुद्धा येथे भेट दिली व अँटिजेन चाचणी कार्यक्रमाची पाहणी केली. रेवदंडा व चौल परिसरात कोरोना रूग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरला असून, चौलमध्ये सध्या 106 व रेवदंडा येथे 56 रूग्ण अ‍ॅटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली.

Exit mobile version