। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील तिरंगा पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.28) पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. वार्षिक सभेचे अध्यक्षस्थान पतसंस्थेचे अध्यक्ष अलंकार परदेशी यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत उपस्थित होते.
यावेळी तिरंगा पतसंस्थेच्या सभागृहाला देण्यात आलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्या नावाचे उद्घाटनही करण्यात आले. यमुना सामाजिक संस्थेतर्फे चिरनेर गावाला देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा फायदा येथील रुग्णांना होत असून या गाडीसाठी लागणारा डिझेलचा सर्व खर्च सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी व चिरनेर ग्रामपंचायतीच्या सदस्या शीतल घबाडी करीत असल्यामुळे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाजीराव परदेशी, महेंद्र ठाकूर, सरपंच संतोष चिरलेकर, किशोर भगत, शितल घबाडी, यशोदा परदेशी, सविता केणी, उमेश भोईर, हितेंद्र घरत, आनंद ठाकूर, चेअरमन सुनील नारंगीकर सर्व संचालक सभासद कर्मचारी व पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते