| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील धानकान्हे गावच्या रहिवाशी असणार्या अनुसया उमाजी कचरे यांचे रविवारी (दि.29) डिसेंबर रोजी वयाच्या सुमारे 85 व्या वर्षी राहत्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून, त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार, दि.7 जाने. रोजी तर अंतिम धार्मिक विधी गुरूवार दि.9 जाने. रोजी धानकान्हे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.







