लावलेले झेंडे उतरवायचे कोणी?

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सब पनवेलसह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी बहुतांशी घरांवर, प्रशासकीय कार्यालयांवरे, वाहनांवर नागरिकांनी झेंडे लावून अमृतमहोत्सव साजरा केला. मात्र अनेक ठिकाणी अजूनही झेंडे खाली उतरवण्यात आले नाहीत. त्यामुळे हे झेंडे उतरवायचे कोणी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज लावायचे होते. त्यानंतर 15 ऑगस्टला सायंकाळी उतरवायचे होते. मात्र 18 ऑगस्ट उजाडला तरीही हे झेंडे खाली काढण्यात आले नाहीत. त्यामुळे झेंडे काढण्याविषयी नागरिकांना समजावण्यात प्रशासन अपयशी ठरले का, असा सवाल विचारला जात आहे. ग्रामीण भागात प्रशासनामार्फत केलेली जनजागृती पोहोचलीच नाही. त्यामुळे आजही लावलेले झेंडे काढण्यात आले नाहीत.

पनवेल महानगरपालिका हद्दीत पनवेल शहर, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल तसेच पनवेल तालुक्यात देखील विविध ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत. 15 ऑगस्ट होऊन गेला तरी देखील झेंडे काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे कोणी काढायचे प्रशासनाने की नागरिकांनी, असा प्रश्‍न पडला आहे.

Exit mobile version