6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं

प्रकाश आंबेडकर यांचं सगळ्यात मोठं वक्तव्य
| पुणे | प्रतिनिधी |
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना मोठं विधान केलं आहे. 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आलं आहे.

कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकतं. सध्या सुरु असलेल्या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. छगन भुजबळ यांना जेलबाहेर काढणारा मीच आहे. मी जर न्यायाधीशांना शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ जेलबाहेर आले नसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जातंय. देशात सत्ता बदललेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळी भूमीका घेतात. आणि परराष्ट्रमंत्री वेगळा निर्णय युद्धाबाबत घेत आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version