अपरांत हॉस्पिटल देशात आदर्श ठरावे – उदय सामंत

चिपळूण । प्रतिनिधी ।
अपरांत हॉस्पिटल रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी महाराष्ट्रात नाही तर देशात आदर्शवत ठरेल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. अपरांत हॉस्पिटल आणि चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उभरण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात चिपळूण येथे ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, विक्रांत जाधव,आ.शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, माजी आ. सदानंद चव्हाण,सुरेखा खेराडे, अपरांत हॉस्पिटलचे डॉ.विजय रिळकर, डॉ.यतीन जाधव, वैभव विधाते, प्रवीण पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी,सर्व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत म्हणाले आरोग्याची सुविधा निर्माण झाली असली तरी तिचा वापर कमीत कमी व्हावा. या डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना चांगली रुग्णसेवा दिली जाईल. समाजाला आपण काहीतरी देण लागतो या भावनेतून नगरपालिकेला सोबत घेऊन येथील लोकांना येथेच बर करण्यासाठी आपण हाती घेतलेली ही चळवळ कौतुकास्पद आहे असे सामंत म्हणाले. चिपळूण नगरपालिकेने ऑक्सीजन प्लांट येथे जोडला आहे, हे देखील कौतुकास्पद आहे.कोव्हिडची पहिली लाट आपण थोपावली आहे. दुसरी लाट संपत आली आहे. परंतु तिसरी लाट येऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन सामंत यांनी यावेळी केले.

Exit mobile version