। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
श्री वरदायिनी राबगाव यांच्या वतीने सुधागड तालुका आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत आपटवणे विरुद्ध रासळ या संघात झाली. या लढतीत ऊँ कालभैरव आपटवणे हा प्रथम क्रमांकाच मानकरी ठरला या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक जय हनुमान रासळ या संघास रोख रक्कम 10 हजार रु व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी भैरीनाथ वावे तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कालभैरव भार्जे या दोन्ही संघास प्रत्येकी 7 हजार रु व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे, उत्कृष्ट चढाई वैभव खाडे, तर उत्कृष्ट पक्कड निलेश सकपाळ, पब्लिक हिरो सोहंम साळुंखे खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.







