अपोलो हॉस्पिटल आणणार क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन

| पनवेल । वार्ताहर ।
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मधील नवीनतम तंत्राचा वापर करून विकसित केलेले, निदानाची अचूकता, डॉक्टरांची उत्पादकता आणि रुग्णांचे समाधान या सर्व एकाच ठिकाणी व एकाच वेळी देणारे मक्लिनिकल इंटेलिजन्स इंजिनफ आता नवी मुंबईतही उपयोगात आणले जाणार आहे. अपोलो हॉस्पिटल्स समूहाने वैद्यकीय चिकित्साविषयक निर्णयांना समर्थन देणारे हे साधन, अपोलो क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन, बाजारात आणण्याची घोषणा केली असून सर्व भारतीय डॉक्टरांसाठी अपोलो 24/7 च्या व्यासपीठावर वापरण्यासाठी खुले राहील. भारतीय आरोग्य सेवेत क्रांती आणण्यासाठी सज्ज आहे.

क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन आरोग्यसेवेतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्‍लेषण करून असे नमुने ओळखण्यास मदत करेल जे अन्यथा लक्षात आले नसते किंवा चुकले असते. संख्यात्मकदृष्ट्या इन्टेलिजन्स इंजिनच्या शब्दसंग्रहात 1300 हून अधिक परिस्थिती आणि 800 लक्षणे आहेत, ज्यात ओपीडी मध्ये येणार्‍या रोजच्या केसेसमधून 95 टक्के भाग समाविष्ट आहे. 40 वर्षांचा डेटा, 1000 डॉक्टरांच्या एकत्रित बुद्धिमत्तेचा वापर करून आणि या क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञ व समवयस्कांच्याकडून पुनरावलोकन केलेल्या नियतकालिकांमधील समर्थन देणार्‍या माहिती या सर्वांचा वापर करून 100 हून अधिक अभियंत्यांनी तयार केलेले हे इंटेलिजन्स इंजिन जगातील सर्वात मोठ्या कनेक्टेड हेल्थ डेटालेक पैकी एक असेल, जे काही जागतिक शैक्षणिक संस्थांद्वारे व प्रमाणित केले गेले आहे. 500 हून अधिक अपोलो डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या अपोलो हॉस्पिटलमधीलच टीमद्वारे तयार केलेले, आणि वेळोवेळी पुनरावलोकन केले जाणारे ज्ञानाच्या आधाराने बनवण्यात आले आहे.

Exit mobile version