चिदंबरम यांच्याकडून सकारची माफी


नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान मोदी यांच्या मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मात्र, टीका करताना चिदंबरम यांनी मोदी सरकारने खोटा आरोप केल्याचा म्हटलं होतं. या टीकेनंतर चिदंबरम यांनी आता एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी काल सरकारवर टीका करता झालेली चूक मान्य केली आहे. राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. सोशल मीडियावरील एका कार्यकर्त्यांने पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचं पत्र पोस्ट केलं. मी चुकलो. मी माझी भूमिका दुरुस्त केल आहे, असा खुलासा चिदंबरम यांनी ट्विट करून केला आहे.

Exit mobile version