ई-केवायसी करण्याचे आवाहन

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा येथील स्वस्त धान्य दुकानात बोगस धान्य वाटपाला आळा बसावा म्हणून शिधा पत्रिकेवर नावे असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करण्यात येत आहे. तसेच, 30 सप्टेंबर पर्यंत केवायसी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे शिर्के यांनी सांगितले. म्हसळा तालुक्यात आतापर्यंत फार कमी प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून लवकरात लवकर सिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांनी केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जे रेशनकार्ड ई-केवायसी करणार नाही, त्यांना धान्य वितरीत केले जाणार नाही. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे. लवकरात लवकर ई-केवायसी झाले नाही तर अडचणी येऊ शकतात. यातून बनावट शिधापत्रिका धारक शोधण्यात येत आहेत. बरेच ग्राहक चुकीच्या पद्धतीने रेशन घेतात. त्यांनाही यामुळे आळा बसेल. धान्यवितरणात पारदर्शकता यावी यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तसेच, सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागाअंतर्गत रेशनकार्ड ई-केवायसी असा नवीन आदेश जाहीर केला आहे. कार्डधारकाने ई-केवायसी केला नाही आणि अधिकार्‍यांना तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर त्याचे नाव रेशनकार्ड यातून हटविले जाईल, अशी माहिती पुरवठा कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून केले जात आहे.

Exit mobile version