अपंग आदिवासी चंदर आवटेंचे मदतीचे आवाहन

| रसायनी | वार्ताहर |

आदिवासी ठाकूर समाजाचे मोरबे धरण क्षेत्रातील पोखरवाडी येथील चंदर दामा आवटे यांना काम करीत असताना दोन्ही पायांना दुखापत होऊन अपंगत्व आले. परिणामी, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांना चालता येत नसल्यामुळे ते कोणताही व्यवसाय करू शकत नाही. त्यांनी याबाबत स्थानिक नेत्यांना अपंग असल्यामुळे अपंगाची गाडी मिळावी यासाठी विनंती केली होती. परंतु, त्यांना कोणीही मदत केली नाही. त्यांना मदत मिळावी अशी त्यांची इच्छा असून, 8669937613 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version