सबलीकरण, स्वाभिमान योजनेबाबतआवाहन

| रत्नागिरी | वार्ताहर |

सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्ररेषेखालील भूमिहीन कुटुंबांना चार एकर जिरायती शेतजमीन किंवा दोन एकर बागाती शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी दिली.

लाभार्थी हा अनुसुचित किंवा नवबौद्ध घटकातील, दारिद्य्ररेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा. लाभार्थीचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे असावे. जमीन ज्या गावात उपलब्ध आहे, त्याच गावाचे रहिवाशी अर्ज करण्यास पात्र असतील. महसूल विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम, दारिद्य्ररेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्त्या स्त्रीया, दारिद्य्ररेषाखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विधवा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त असा आहे.

Exit mobile version