पोस्टाच्या अपघाती विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन

। म्हसळा । वार्ताहर ।

भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बजाज अलियन्स कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी योजनेंतर्गत विचारविनिमय सभा तहसील कार्यालय म्हसळा येथे तहसीलदार समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी पोस्टाच्या कॅशलेस अपघाती विमा पॉलिसीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले.

याप्रसंगी पोस्टातील कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या योजनेंतर्गत केवळ वार्षिक 396 रुपयांत अपघाती मृत्यू 10 लाख, कायमस्वरूपी अपंगत्व 10 लाख, कायमस्वरूपी अंशता अपंगत्व 10 लाख, अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस साठ हजार रुपये, अपघातामुळे बाह्यरुग्ण दवाखाना खर्च तीस हजार रुपये, दवाखान्यात ॲडमिट असेपर्यंत प्रतिदिन एक हजार रुपये, मुलांचा शिक्षण खर्च एक लाख रुपये, कुटुंबाचा दवाखाना प्रवास खर्च पंचवीस हजार रुपये, अंत्यसंस्कारासाठी रु. पाच हजार अशा अनेक योजना असून, लाभर्थ्यांनी याचा लाभ उठविण्याचे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी करून या योजनेचा लाभ 18 ते 65 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version