| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड नगरपरिषदेकडून मुरुड शहरातील लोकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. ऑटो रिक्षाद्वारे संपूर्ण मुरुड शहरात घरपट्टी व पाणी पट्टी भरून मुरुड नगरपरिषदेस सहकार्य करावे असे सबगितले जात आहे. मुरुड शहरातील नागरिकांकडून आतापर्यंत 48 टक्के लोकांनी घरपट्टी भरली आहे.तर उर्वरित राहिलेल्या लोकांनी मार्च महिन्याचं आत घरपट्टी भरणे क्रमप्राप्त आहे.यासाठी नगरपरिषदेकडून जनजागृती करण्यात येत असून लोकांना लवकरात लवकर भरणा करण्याचे सांगण्यात येत आहे.मुरुड शहराची लोकसंख्या 12 हजारच्या आसपास असून येथे घरपट्टी व पाणी पट्टी भरण्याचे सरासरी वार्षिक आकडा 90 टक्केच्या आसपास आहे.लोक उत्तम सहकार्य करणारे असून आपले द्येयके भरण्यात त्यांचा नेहमीच प्रामाणिक पणा दिसून येत आहे. सध्या नगरपरिषदेने वसुली मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जनजगृती बरोबरच कर्मचारी स्वतः लोकांच्या घरी पोहचत असून लोकांना घरपट्टी व पाणी पट्टी भरण्यासाठी आग्रह करीत आहेत.शहरी नागरिक सुद्धा मुरुड नगरपरिषदेस उत्तम सहकार्य करताना दिसत आहेत.