डेंग्यूवर उपाययोजना करण्याचे आवाहन

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत शहरात डेंग्यू सदृश रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यानी शहरातील सर्व पॅथॉलॉजी क्लिनिक यांच्या सोबत बैठक घेऊन उपययोजना बाबत चर्चा केली.

शहरात मागील महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाकडून काऊंटर तपासणी मोहीम घेण्यात आली. त्यावेळी शहरातील काही ठराविक भागात डेंग्यू चे रुग्ण आढळून आले होते. सुवर्णा जोशी यांनी सर्व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शहरातील सर्व भागात फिरून डेंग्यू सदृश रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र शहरातील डेंग्यूच्या रुग्ण यांची संख्या कमी होत नसल्याने पालिकेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील सर्व पॅथॉलॉजी चालक यांना पाचारण करुन उपाय योजने बाबत चर्चा केली. यावेळी कल्पेश पटेल, अबिद खान, बी आर माने, कल्पेश कुलकर्णी, अक्षदा विषे आदी उपस्थित होते.

Exit mobile version