महाविकास आघाडीकडून ‘मशाल’ घराघरात

| रसायनी | वार्ताहर |

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व इंडिया आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार दौरा ‘न भूतो न भविष्यती’ असा गाव पातळीवर इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले पदाधिकारी व शिवसेनेचे शिलेदार ‘जीवाची बाजी’ लावून प्रचार करत असून शिवसेनेची निशाणी ‘मशाल’ व महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार दौरा गावागावात-घराघरात पोहचला आहे.

उरण विधानसभा हद्दीतील मतदार राजाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी घरात जाऊन सांगत असून मिळणारा प्रतिसाद नक्कीच विजयाच्या शिखरावर नेणारा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मतदार राजाला एक संधी संजोग वाघेरे पाटील यांना देवून आपले मत ‘हुकुमशाही विरोधात’ देवून आपले कर्तव्य बजवावे, असे प्रचाराची मोहीम सांभाळणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईंर घराघरात सांगत असल्याने दिसून येते. दिवसेंदिवस इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे ‘पारडे जड’ होत असून मावळातून संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे.

उरण विधानसभा शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची गती ‘गावनिहाय पातळीवर’ दिवसेंदिवस वाढत आहे. गावनिहाय प्रचार दौरा जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभागात येणार्‍या ग्रामपंचायत हद्दीत जोरदार प्रचार सुरु आहे. संजोग वाघेरे पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणारच, असे मत जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईंर यांनी व्यक्त केले. उरण विधानसभा मतदारसंघात प्रचार करण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उबाठाचे बबन पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकापचे प्रितम म्हात्रे, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, खालापुर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे आदीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून मावळ लोकसभा निवडणुकीत संजोग वाघेरे पाटील यांच्या मशाल निशाणीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

Exit mobile version