कार्यकर्त्यांकडून ‘लाल बावटे की जय”चा नारा
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी ‘लाल बावटे की जय’च्या घोषणेत उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने सक्षम, उच्चशिक्षित व सामाजिक कार्यात सक्रिय अशा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात वकील, डॉक्टर, बी.ए., बी.एड. शिक्षण घेतलेले असून, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी रोहा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे मतदार निश्चितच या उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गटांसाठी भुवनेश्वर गटातून गणेश कृष्णा मढवी, आंबेवाडी गटातून प्रतीक्षा शिरीष महाबळे व साक्षी अशोक घावटे, घोसाळे गटातून रूपाली गणेश मढवी व वैष्णवी हेमंत ठाकूर, तसेच नागोठणे गटातून ॲड. रोशन पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत.
पंचायत समितीच्या आठ गणांसाठी भुवनेश्वर गणातून खेळू ढमाळ, धाटाव गणातून दर्शना समीर खरिवले, आंबेवाडी गणातून मारुती खांडेकर, शिवराम महाबळे व मनोहर महाबळे, कोलाड गणातून साक्षी अशोक घावटे, घोसाळे गणातून शंकर दिवकर व विनायक धामणे, न्हावे गणातून रूपाली गणेश मढवी व सागरी राजेंद्र मळेकर, तसेच नागोठणे गणातून कांचन माळी, सुषमा दिवकर आणि सुकेळी गणातूनही पंचायत समितीच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, आर.डी.सी. बँक संचालक गणेश मढवी, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजदूर फेडरेशन अध्यक्ष हेमंत ठाकूर यांच्या उपस्थितीत “लाल बावटे की जय”च्या घोषणेत हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी कार्यलयीन चिटणीस संदेश विचारे, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक धामणे, मारुती खांडेकर, तुकाराम खांडेकर, विठल मोरे, बाळाराम धामणसे, रोहा शहर चिटणीस गणेश महाकाळ, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीनाथ गंभे, व्हा. चेअरमन विकास तांडेल, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, विभागीय चिटणीस शंकर दिवकर, महिला आघाडी प्रतिनिधी कांचन माळी, विभागीय चिटणीस अरविंद भिलारे, प्रविण जांभेकर, लिलाधर मोरे, महादेवखार सरपंच संकेत जोशी, कामगार आघाडी अध्यक्ष राजेंद्र मळेकर, राम महाडीक, धनाजी लोखंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
