निवडणूक विभागाकडे 400 अर्ज दाखल
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या कामासाठी विविध सरकारी विभागातील सुमारे साडेसात ते आठ हजार कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. तरी जिल्ह्यात त्या-त्या विभागात कोणत्याही केंद्रावर नियुक्ती होणार असल्याने अनेकांना निवडणूक ड्यूटी नावडती झाली आहे. ही ड्यूटी रद्द व्हावी, यासाठी 400 जणांनी वैद्यकीयसह अनेक कारणे दिली आहेत.
दरम्यान, कर्मचार्यांनी केलेल्या अर्जांमध्ये कोणाला उच्च रक्तदाब, मधुमेह, निवृत्ती आली आहे, मुलाचे-मुलीचे लग्न आहे, काही महिलांनी गर्भवती असल्याचे कारण दिले आहे. निवडणूक विभाग यावर निर्णय घेणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया अगदी पारदर्शक व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतेरा लाखांच्या दरम्यान मतदार आहेत. सतराशेच्यावर मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रिया होण्यासाठी निवडणूक कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने विविध शासकीय विभागातील सुमारे साडे 7 ते 8 हजार कर्मचार्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. त्यासाठी या कर्मचार्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचार्यांची जिल्ह्यातील त्या-त्या विभागात कोणत्याही मतदान केंद्रावर नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 400 शासकीय कर्मचार्यांनी निवडणुकीची ड्युटी रद्द व्हावी, यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जामध्ये अनेकांनी विविध वैद्यकीय कारणे दिली आहेत. निवडणूक विभाग वैद्यकीय कारण आणि वस्तुस्थितीचा विचार करून यावर निर्णय घेणार आहे. खरे कारण असेल तर अर्ज मंजूर केला जाईल अन्यथा फेटाळला जाईल, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.