| माणगाव | प्रतिनिधी|
गावकामगार पोलीस पाटील संघाच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील मांजरवणे गावचे पोलीस पाटील अ. जलील याकूब फिरफिरे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांना तशा आशयाचे नियुक्ती पत्र गोरेगाव येथे झालेल्या पोलीस पाटील संघाच्या माणगाव तालुका कार्यकारिणी निवडीत गोरेगोव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले व संघाचे राज्य सचिव कमलाकर मांगले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अध्यक्ष संतोष दळवी, चंद्रकांत चेरफळे, कुणाल लोंढे, राम देशमुख, दिनेश टेम्बे, विजय खुंटले मलिंद पोपेटा, सानवी चव्हाण, नेहा साळवी, सीमा डोंगरे, नागराज पवार, किशोर कदम, व जिल्ह्यातील इतर मान्यवर पदाधिकारी आदी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षा रश्मी खराडे, सचिव मनोहर धुमाळ, सहसचिव हरीचंद्र साळवी, सहसचिव रमेश साळवी, खजिनदार आरती जंगम, सहखजिंनदार निधी धाडवे तर सदस्यपदी बाळाराम पवार, सचिन शिंदे, दीपक भोसतेकर, शांताराम शिंदे, नलिनी बामणे, समीर मुरुडकर, यशवंत पानवकर, शरद मोरे यांची निवड करण्यात आली.






