जितेंद्र टेंबे यांची तहसीलदारपदी नियुक्ती

| तळे | वार्ताहर |

लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना निवडणूक यंत्रणा व्यवस्थितपणे काम करण्याचे दृष्टीने तळा तालुका निवडणूक नायब तहसीलदारपदी जितेंद्र शिवाजी टेंबे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून तहसीलदार स्वाती पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. टेंबे हे यापूर्वी माणगाव तालुक्यात निजामपूर येथे मंडळ अधिकारी म्हणून तीन वर्षे कार्यरत होते. त्यांची महसूल विभागात 24 वर्षे सेवा झाली असून त्यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेपासून शेतकरी बांधवांना चांगले सहकार्य केलेले आहे.

शासनाच्या योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी देखील प्रामुख्याने प्रयत्न केला आहे. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी आपले कार्यकाळात काम केले आहे. त्यांचे स्वागत करते समय निवासी नायब तहसीलदार मंगेश पालांडे, मंडळ अधिकारी राऊत, जाधव, महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version