। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत मधील नालदे गावातील रहिवाशी असलेली आणि पोलीस सेवेत सेवा बजावत असलेले मधुकर जानु म्हसे यांना पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक होण्याची संधी मिळाली आहे. अंबरनाथ पोलिस स्टेशनचे कार्यरत पोलिस हवालदार मधुकर जानु म्हसे यांना पदोन्नती मिळाली आहे सध्या कायम वास्तव्य डिकसळ येथे असून अंबरनाथ पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असून 31 वर्षे नोकरी झालेली आहे.