| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
शिवसेनाप्रणित जय महाराष्ट्र शिवराज्य माथाडी जनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते किरण पावसकर आणि संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्य माथाडी जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष समीर सागर, संघटनेचे खजिनदार सचिन मोरे, सरचिटणीस रवी राणे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्र चिटणीसपदी महेंद्र पवार, दिनेश शर्मा यांची राज्य उपाध्यक्ष, हनुमंत ताम्हणकर यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, जनार्दन थोरवे यांची उत्तर रायगड अध्यक्ष, संजय शेडगे यांची पनवेल तालुका उपाध्यक्ष, विक्रांत कदम यांची रोहिंजन तळोजा विभागाध्यक्ष, निलेश घुले यांची पनवेल तालुका चिटणीस, तर संजय सावंत यांची जय महाराष्ट्र शिवराज्य माथाडी जनरल कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवराज्य माथाडी जनरल कामगार सेना ही माथाडी कामगारांसाठी काम करणारी संघटना असून, संघटनेच्या राज्यभरातील जिल्ह्यात शाखा असल्याची माहिती संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.