। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील फुंडे रयत शिक्षण संस्थेच्या महालण विभाग येथील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. आमोद ठक्कर यांची दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून नेमणूक झाली आहे. डॉ. आमोद ठक्कर हे गेले तीन दशके वीर वाजेकर महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. यावेळी, पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष माजी आमदार बाळाराम पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, भावना घाणेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुधीर धरत, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्यपदी ठक्कर यांची नियुक्ती
