| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील चौल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत नवीन पदाधिकारांच्या नियुक्ता जाहीर करण्यात आल्या असून, चौल उपविभाग प्रमुखपदी शैलेश घरत, तर शाखाप्रमुखपदी राजेंद्र गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अलिबाग येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 32 रायगड लोकसभेचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, चौल शिवसेना विभाग प्रमुख मारूती भगत, चौल ग्रा.पं. माजी उपसरपंच अजित गुरव, माजी सदस्य अजित मिसाळ आदी उपस्थित होते.
नव्याने नियुक्ती झालेले चौल उपविभाग प्रमुखपदी शैलेश घरत, तर शाखाप्रमुखपदी राजेंद्र गुरव यांचे शंकर गुरव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.