। खोपोली । प्रतिनिधी ।
सध्याच्या स्थितीत देशात,राज्यात समाजविघाटक कारस्थाने,दोन धर्मांमध्ये भांडणे,जातीपातीचे राजकारण सुरू असल्याचे समाजमाध्यमांवर,वृत्तपत्रांमधून वाचत आहोत.मात्र या गोष्टीचे खोपोलीकरांनी कुठेही परिणाम होवू न देता सर्व धर्मातील सण एकत्रित येवून मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत.त्यामुळे खोपोलीकरांच्या नसानसात शांती आणि आमण भरले असल्याचे कौतुक पोलिस निरिक्षक शिरिष पवार यांनी काँग्रेस शहराच्या वतीने आयोजित ईद-ए-मिलन कार्यक्रमात बोलताना केले आहे.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काँग्रेस आय खोपोली शहराच्यावतीने मुस्लिम वेल्फेयर सभागृहात ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार होते. यावेळी कृष्णा पारंगे,सूर्यकांत देशमुख, कैलास गायवाड, शाम कांबळे,चिंतामनी सोनवणे, दिलीप पुरी, रिचर्ड जाँन, हैदर फक्की,महमूद ,फक्की, निवृत्ती मोरे, विलास गायकवाड, अबू खोत, उस्मान शेख, अरुण गायकवाड,मेराज भाई, शेखर परब, शंकर सावंत, जमाल सोरटीया,शारिफा शेख,प्रिया जोगदंड,अस्मिता साळुंखे,प्रमिला तिवारी,रिहणा शेख,ममता पांडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जाधव यांनी तर आभार युवक शहर अध्यक्ष संदेश धावारे यांनी मानले.







