| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नांदगाव या केंद्राने जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहेत. येथील शिक्षण विभागाच्या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी राबविलेले उपक्रम यांच्याबद्दल तालुका पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांनी कौतुक केले.
तालुक्यातील दुर्गम भागातील उपक्रमशील शाळा असलेल्या झुगरवाडीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण विभागाच्या नांदगाव केंद्राची शिक्षण परिषद घेण्यात आली. त्यावेळी तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे, वसंत पारधी, गोविंद दरवडा, लोहकरे, कटके, देसले उपस्थित होते. रवी काजळे यांनी प्रास्ताविक करून झुगरे वाडी शाळेची प्रगती चा आढावा घेतला आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणते उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.
या शिक्षण परिषदेत स्वप्नील पितळे, सतीश घावट, नवीन हेमावत शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. तर शिक्षक प्रदीप सैदाने, रोहिदास पवार, भाऊ पानसरे, रुपेश गायकवाड यांनी आठवी शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याविषयी योगेश धुमाळ, प्रदीप सैदाने, गोविंद दरवडा यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते विक्रम अडसूळ, ज्ञानदेव नवसरे, नारायण आणि यांच्यासह सर्व सहकारी यांचे कौतुक केले.