बिर्ला कंपनीचे कौतुकास्पद योगदान

। रसायनी । वार्ताहर ।

सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक शाळेमध्ये सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. दरवर्षी दहावी-बारावी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी शुभचिंतन समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे शैक्षणिक साहित्य व हेल्थ किटचे वाटप केले जाते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधत बिर्ला कार्बन कंपनी पाताळगंगा कंपनीमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले बिर्ला कंपनीचे अमेरिकन अधिकारी रँडी वास्कूल यांनी उपस्थिती दाखवत आपल्या शुभहस्ते विद्यार्थ्यांसाठी एक्झाम पॅड, गुड नाईट किट, डेटॉल बॉटल, मास्क, सॅनिटायझर, कंपास पेटी, पेन, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण इत्यादी स्वरूपाच्या हेल्थकिटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बिर्ला कार्बन कंपनीच्या सीएसआर फंडातून नामांकित गोदरेज कंपनीचे तब्बल 40 बेंचेस रँडी वास्कूल यांच्या शुभहस्ते शाळेसाठी प्रदान करण्यात आले. सोबतच अ‍ॅमी हिकमन, हेली शाह, मॅलथॉस या सर्व परदेशी पाहुण्यांचे आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे यथोचित सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड रवींद्र रघुवंशी, विजय अग्रवाल, पुर्निंदो कुमार, संदीप कुमार, निखिल भामरे, सचिन कंदले, मयुरी शिरोडकर, लक्ष्मण मोरे, प्रशांत गायकवाड आदी कंपनीतील अधिकारी वर्ग तसेच, योगेंद्र शहा, मुख्याध्यापक भोमले, पुजारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version