| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील मेट्रो 4चा विस्तारित भाग असलेल्या आणिक डेपो-वडाळा-गेटवे ऑफ इंडियापर्यंतच्या (मेट्रो 11) तब्बल 17 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या मार्गावर 13 भुयारी आणि एक उन्नत अशी एकूण 14 स्थानके असणार आहेत. तसेच, 23 हजार 487 कोटींचा खर्च होणार आहे.
मुंबई मेट्रो-11 ही मूलतः मुंबई मेट्रो-4चा (वडाळा-ठाणे-कासारवाडवली) विस्तार म्हणून वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी नियोजित होती. त्यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फेत (डीएमआरसी) प्रकल्प अहवाल तयार केला होता; मात्र, हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, म्हणून भुयारी मेट्रो उभारण्याचा अनुभव असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे दिला होता. दरम्यान, या प्रकल्पाच्या मार्गिकेचे पुनर्निरीक्षण करून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत मार्गिकेचे आणिक डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया असे सुधारित संरेखन करून सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल ‘डीएमआरसी’कडून तयार करून घेतला आहे. त्यामध्ये 13 भूमिगत आणि भू-समतल स्थानकाचा समावेश असलेल्या एकूण 17.51 किलोमीटर लांबीच्या आणि 23 हजार 487 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात आणिक डेपो, वडाळा परिसरातून फोर्ट परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित मेट्रो मार्गाला मंजुरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606