संजय गांधी योजनेच्या ८२ प्रकरणांना मंजुरी

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तहसील कार्यालयात सोमवार (19) सप्टेंबर रोजी संजय गांधी योजना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 82 प्रकरणांना मंजुरी दिल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेची 71 प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यात श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची 4, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे 1, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेची 2 प्रकरणे मंजूर करण्यात आली.

राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेची 5 प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनांच्या प्रकरणातील 81 हजार 500 अनुदान तसेच कुटूंब अर्थसहाय्य लाभार्थ्यांना प्रत्येकी एक रकमी 20 हजारप्रमाणे 80 हजार असे एकूण 1 लाख 61 हजार 500 एवढे अनुदान वाटप करण्याबाबत बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात दरमहा विशेष सहाय्य योजनेंतर्गत एकूण 5 हजार 131 लाभार्थ्यांना रक्कम रूपये 44 लाख 19 हजार 600 एवढे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

Exit mobile version